बातम्यांची मुलूखगिरी

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

How to Make Money From a News Portal
Home » महाराष्ट्र » लाडक्या बहीण योजनेवरून पुन्हा ठिणगी, आता या मंत्र्यानेच दिला घरचा आहेर, निधी कपातीवर जाहीर नाराजी

लाडक्या बहीण योजनेवरून पुन्हा ठिणगी, आता या मंत्र्यानेच दिला घरचा आहेर, निधी कपातीवर जाहीर नाराजी

Facebook
Twitter
WhatsApp

लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. अनेक योजनांचा पैसा या योजनेकडे वळवल्याचा विरोधक आरोप करत आहेत. त्यात महायुतीमधून सुद्धा या योजनेवर तोंडसुख घेण्यात येत आहे. आता महायुतीमधील बड्या नेत्यानेच सरकारला घरचा आहेर दिला आहे. निधीसाठी कसरत करावी लागत असल्याने मंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याच्या निधीला लाडकी बहीण योजनेसाठी कात्री न लावण्याची आग्रही मागणी केली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी टोचले कान

लाडकी बहिण योजना चांगली आहे.त्यासाठी पैसे दिले पाहजे.यात दुमत नाही.परंतु विकासाची कामे कमी केले हरकत नाही.मात्र माझा आक्षेप की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदी नुसार पैसे द्यावे लागत आहे. यात निधी कट करता येत नाही. लाडकी बहीण साठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजना साठी १५०० कोटी, ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असा एकूण सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे असे गणितच मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले.

तर मग उद्रेक होईल

हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे.मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी या खात्याला कट बसला तर कमी कसे होतील? यासाठी तरतूद करून द्या अस माझं मत आहे. परस्पर पैसे वळवले तर त्याचे दुर्गामी परिणाम होईल. त्याचा उद्रेक होईल, असा इशारा मंत्रिमहोदय द्यायला विसरले नाहीत. यासाठी मी विनंती करेल सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये यासाठी मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहजे होती.संमती मागितली असती तर मला देता आली नसती.हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे, अशी नाराजी ही त्यांनी व्यक्त केली.

marathimulukh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप स्टोरी

Share Market

Gold & Silver Price