केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील राज्याचे नागरी व अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बाराशे पानाहून अधिकचे आरोप पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये वाल्मिक कराड यास एक नंबरचा आरोपी म्हणून या प्रकरणी आरोप ठेवल्यावर आठवले यांनी ही मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला. या प्रकरणातील एक आरोपी वगळता इतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांनी राजीनामा देण्यासाठी चोहोबाजूंनी दबाव वाढत असताना भरिसभर म्हणून आठवले यांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आठवले नक्की काय म्हणाले ते बघा
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता. धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी होत असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
