नांदेड जिल्हयातील किनवटच्या अंबाडी घाटात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. यापूर्वी देखील हा वाघ या परिसरात अनेकांना दिसला होता. शुक्रवारी रात्री अंबाडी जंगल क्षेत्रात हा वाघ एका रोह्याच्या माघे धावताना दिसला . यावेळी चारचाकी गाडीतून जाणाऱ्या दोघांना वाघ दिसताच त्यांनी वाहन थांबविले. लाईटच्या उजेडात वाघाचे डोळे दीपले , त्यामूळे काही क्षण वाघ रस्त्यालगत थांबला . तितक्यात रोही आपला जीव वाचवून पळून गेला , नंतर वाघ देखील जंगलात निघून गेला.
