दोन दुष्यावर सेन्सर बोर्डाने चालवली होती कात्री
शोले हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. चित्रपटातील संवाद प्रत्येक रस्त्यावर घुमत होते. या चित्रपटात चित्रित करण्यात आलेले दोन सीन सेन्सर बोर्डने घेतलेल्या हरकती नंतर काढून टाकण्यात आले होते.
चित्रपटाचा भारतीय मानसिकतेवर खोलवर परिणाम झाला. ३८ वर्षांनंतर, हा चित्रपट ३डीमध्ये रूपांतरित करून पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. १५ ऑगस्ट १९५७ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाशी संबंधित अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. शोले बद्दल काही रंजक माहिती.
पण तुम्हाला माहिती आहे का शोलेचा
शेवट हा वेगळा होता. शोले जेव्हा रिलीज साठी तयार होतं त्यावेळी सेन्सर बोर्डाने घेतलेल्या हरकतीमुळे चित्रपटातील दोन सीनला दिग्दर्शकानं कात्री लावावी लागली होती. रिलीज होण्याच्या पूर्वी चित्रपटात तील शेवटच्या सीनमध्ये संजीवकुमार गब्बरला मारून टाकतो असे दृश्य चित्रित करण्यात आले होते. परंतु, सेन्सर बोर्डाने यावर हरकत घेतली. जर एक पोलिस ऑफिसरच गुंडांना मारून टाकत असेल तर समाजात चुकीचा मॅसेज जाईल. असे सेन्सर बोर्डाचे म्हणणे होते. यामुळे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनी पून्हा त्याच लोकेशनवर जाऊन सध्या चित्रपट असलेला क्लायमॅक्स शूट करण्यात आला आहे.
‘शोले’मधील आणखी एक दृश्य कापण्यात आले.
गब्बरला भयानक आणि क्रूर बनवण्यासाठी निर्मात्यांनी अनेक अनोखे संवाद आणि दृश्ये तयार केली. दिग्दर्शकाने काही दृश्ये अशा प्रकारे चित्रित केली होती की जेव्हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पोहोचला तेव्हा प्रेक्षकही घाबरले आणि त्यांना चित्रपटातून तात्काळ काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाच एका दृश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये गब्बर सिंगचे धोकादायक रूप दिसत आहे.
अमजद खान शोलेमधील गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसत आहेत. सचिन पिळगावकर त्यांच्या समोर जमिनीवर पडलेले दिसत आहेत. या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी अहमदची भूमिका साकारली होती. चित्रात तुम्हाला सचिन जमिनीवर तोंड करून पडलेला दिसतो आणि अमजद खान त्याचे केस ओढून त्याला वर करण्याचा प्रयत्न करत आहे.
आजूबाजूला सशस्त्र डाकूंचा एक गट तैनात आहे. हा त्या दृश्याचा एक भाग आहे ज्यामध्ये सचिन त्याच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार नोकरीसाठी दुसऱ्या गावी जात आहे. दरम्यान, डाकूंचा एक काफिला त्यांना पकडून गब्बरकडे घेऊन येतो. या दृश्यानंतर, ते त्यांना मारतात. सचिन पिळगावकरला मारण्याच्या संपूर्ण दृष्यावर सेन्सर बोर्डाने कात्री लावली आहे.
